आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृती जागवणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तब्बल 11 वर्षांपूर्वी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या कलादालनाची निर्मिती केली गेली.
बाळासाहेब ठाकरे ज्या ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वंदनीय मानत होते, त्याच शिवशाहिरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादान बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. त्याबाबचे एक निवेदन त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा : महाविकास आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची टीका
कलादालनाच्या तळघरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसंबंधी छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलक आहेत. तर तळमजल्यावर या चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांची तैलचित्रे आहेत. तसेच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं, प्राचीन संस्कृतीचं, भौगोलिक समृद्धतेचं दर्शन घडवण्यासाठी विविध कलात्मक बाबी येथे आहे. परंतु संयुक्त महाराष्ट्र कलादालन उभारल्यानंतरही या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला नाही. आणि त्यापेक्षाही दुर्दैवी बाब म्हणजे मुंबई महापलिकेने पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेने व दृष्टीने कलादालनाची निर्मिती केली होती, ते कलादालनच आज महापालिकेच्या इच्छेअभावी दुर्लक्षित आहे, असं प्रभाकर शिंदे म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा व भावनेचा एकप्रकारे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अपमानच केला आहे. यामुळे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब आणि शिवशाहीर बाबासाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पर्यटकांचा इथे ओघ वाढणारच. असं झाल्यास हा बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा व भावनेचा मान असेल तर शिवशाहीर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा सन्मान असेल, असंही प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा, भंकपपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल