Home महाराष्ट्र “मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; राज ठाकरेंकडून प्रबोधनकारांना...

“मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; राज ठाकरेंकडून प्रबोधनकारांना श्रद्धांजली अर्पण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांचा आज 48 वा स्मृतिदिन आहे. प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हे ही वाचा : महाराष्ट्रालाही 2 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची टोलेबाजी

‘मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच!’, ही गर्जना आहे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची. फक्त गर्जना करुन ते थांबले नाहीत. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी मराठीजनांचा स्वाभिमान चेतवण्यासाठी वेचलं., असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र धर्माचा विचार मांडण्यासाठी आपली लेखणी तलवारीसारखी चालवली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या जहाल वाणीसह प्रत्यक्ष कृतीचं शस्त्रही त्यांनी अनेकदा उपसलं. लेखक, वक्ते, समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा आज 48 वा स्मृतिदिन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रबोधनकारांचा विनम्र अभिवादन, असं म्हणत राज ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली; भाजपकडून ‘या’ उमेद्वाराला संधी”

एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार- गोपीचंद पडळकर

“मंत्रीपद हुकल्यामुळं नानांनी मानसिक संतुलन गमावलं; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका”