आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनीगेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे जोपर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. अशातच काल निलंबनाच्या भीतीने संतोष शिंदे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यानंतर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
धरणीमायचं काळीज फाटावं असा हंबरडा या मायमाऊलीनं फोडलाय. या दुःखाचा टाहो आत्ताही सरकारला ऐकायला येत नसेल तर हे मुर्दाडांचं, काळीज नसलेलं सरकार आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : रोहित-राहुलकडून न्यूझीलंडचा धुव्वा; भारताने न्यूझीलंडला 7 विकेटसने पराभव करत मालिका जिंकली
दरम्यान, संतोष शिंदे हा एसटी कामगारांच्या लढ्याचा साथी होता. तुझा निलंबनच्या धास्तीनं जीव घेतला हा सरकारप्रणीत खुनच म्हणावा लागेल, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
धरणीमायचं काळीज फाटावं असा हंबरडा या मायमाऊलीनं फोडलाय.या दुःखाचा टाहो आत्ताही सरकारला ऐकायला येत नसेल तर हे मुर्दाडांचं,काळीज नसलेलं सरकार आहे.संतोष शिंदे हा एसटी कामगारांच्या लढ्याचा साथी होता.तुझा निलंबनच्या धास्तीनं जीव घेतला हा सरकारप्रणीत खुनच म्हणावालागेल.@advanilparab pic.twitter.com/uqZCFOpbpO
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अन्यायाची जबाबदारी टाळता येणार नाही- बाळासाहेब थोरात
“जेंव्हा जेंव्हा शरद पवारांचं सरकार येतं, तेंव्हा दंगली घडतातच”
“किरीट सोमय्यांचे नेक्स्ट टार्गेट आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर; 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”