आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. यावरून आता काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “जेंव्हा जेंव्हा शरद पवारांचं सरकार येतं, तेंव्हा दंगली घडतातच”
हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. पण आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराची जबाबदारी भाजपा सरकारला टाळता येणार नाही. त्यांनी प्रायश्चित घेऊन माफी मागावी, अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारने या शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, देशद्रोही म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवनाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले. शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू या आंदोलनादरम्यान झाला. काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल., असंही थोरात यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“किरीट सोमय्यांचे नेक्स्ट टार्गेट आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर; 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”
भाजप ए.स.टी. कामगारांची डोकी भडकवत आहे; शिवसेनेचा आरोप
“…म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला पाठिंबा”