Home महाराष्ट्र भाजप ए.स.टी. कामगारांची डोकी भडकवत आहे; शिवसेनेचा आरोप

भाजप ए.स.टी. कामगारांची डोकी भडकवत आहे; शिवसेनेचा आरोप

मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून, त्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पाठिंबा दिला आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने आजच्या सामनातील अग्रलेखात भाजपला निशाणा साधला आहे.

सरकार एस. टी. कर्मचाऱ्यांची फिकीर करीत असल्याने आतापर्यंत संयमाने पावले टाकण्यात आली. एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे तूर्तास शक्य नाही हे विरोधी पक्षालाही पक्के माहीत आहे. कामगारांनीही हे सत्य स्वीकारले आहे, पण भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली. 12 आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एस.टी. कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे. दहशत, ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे. त्यात एस.टी. कर्मचाऱ्यांनी स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, एवढीच अपेक्षा! असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

हे ही वाचा : “…म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला पाठिंबा”

सध्याच्या कठीण काळात नोकरी टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे. मोदी सरकारच्या आर्थिक अव्यवस्थेमुळे, नोटाबंदीसारख्या कोसळलेल्या प्रयोगामुळे देशात कोटय़वधी लोकांनी रोजगार गमावला आहे. लॉक डाऊनमुळेही व्यापार-उद्योगाचे बारा वाजले आहेत. मोदी सरकारने अनेक सार्वजनिक उपक्रम कवडीमोल भावात विकायला काढले आहेत. हे चित्र काय सांगते? मोदी सरकारही सार्वजनिक उपक्रम धड चालवू शकत नाही हे सिद्ध झाल्यावरही महाराष्ट्रातील भाजप पुढारी एस.टी. कामगारांची डोकी भडकवीत आहेत. हे माणुसकीला धरून नाही, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, कामगार उद्ध्वस्त झाला तरी चालेल, त्यांच्या चुली कायमच्या विझल्या तरी चालतील, पण आमचे पुढारीपण टिकले पाहिजे. एसटीतील संपकरी कामगारांच्या खांद्यावर बंदुका ठेवून सरकारवर गोळीबार करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भाजपला त्याचा लाभ मिळणार नाही. एसटीतील रोजंदारीवरील 2,296 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तर भाजप ‘पीएम केअर फंडा’तून त्यांना आजन्म पगार देणार आहे काय? एसटीत 93 हजार कर्मचारी आहेत. 15 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ही संख्या हळूहळू वाढत जाईल, असा विश्वासही शिवसेनेने व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी; शरद पवारांचा दावा

सर्वसामान्य जनतेची ताकद आज देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”