Home नांदेड देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा भाजपाला धक्का; काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा भाजपाला धक्का; काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले असून अंतापूरकर यांना एकूण 108840 इतकी मते मिळाली आहेत. तर भाजपचे सुभाष साबणे यांना 66907 इतकी मते मिळाली. 41933 इतक्या मतांनी अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे.

हे ही वाचा : “दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय”

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. याकरिता एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

दरम्यान, माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी निवडून येऊ शकलो. मतदार संघाच्या विकासाचं माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार तसेच हा महाविकास आघाडीचा विजय आहे, असं जितेश अंतापूरकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

 फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

“देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”

…तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल- संजय राऊत