Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी; शरद पवारांचा दावा

उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी; शरद पवारांचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी ठरतील, असं ठाम मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून महाराष्ट्र, बंगाल अन् केरळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी ठरले, असं शरद पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : सर्वसामान्य जनतेची ताकद आज देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

दरम्यान,  सत्ता गेली म्हणून राज्यातील भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. सरकार पाडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार तीन, चार, सहा महिन्यांत पडेल, असे भाजप नेते सांगत होते. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी झाले आहेत. केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तेवढेच महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष अधिक घट्ट झाले आहेत, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

“पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; पाचही सभापती बिनविरोध”

“शेतकऱ्यांसमोर मोदी झुकले, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा”