आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “निवडणुकांमध्ये मोठी किंमत चुकवावी लागण्याच्या भितीने कायदे मागे घेण्याचा निर्णय”
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना यावेळी लगावला.
शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“निवडणुकांमध्ये मोठी किंमत चुकवावी लागण्याच्या भितीने कायदे मागे घेण्याचा निर्णय”
“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”
“पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; पाचही सभापती बिनविरोध”