आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”
पंजाब, युपीसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये होणारा पराभव लक्षात घेता मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला. तसेच उशिरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं. ते चंद्रपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; पाचही सभापती बिनविरोध”
“शेतकऱ्यांसमोर मोदी झुकले, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा”
“एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी अनिल परब-फडणवीस चर्चा; तोडग्याचा फाॅर्म्युला परब देणार”