आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विक्रम गोखले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना सवाल
विक्रम गोखलेंनी यावेळी वाढत्या महागाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देताना पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच यावेळी बोलताना विक्रम गोखलेंनी यावेळी कंगणानं केलेल्या स्वातंत्र्यबाबतच्या वक्तव्याचंही समर्थन केलं. यावरून विक्रम गोखलेंवर सर्वत्र टीकास्त्र होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनंही विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे.
“पद्म पुरस्कार येत आहे”, असं ट्विट करत स्वरा भास्करनं विक्रम गोखलेंनी कंगणाच्या केलेल्या समर्थनाला उत्तर देत गोखलेंवर निशाणा साधला.
Padma award coming up https://t.co/aB77GOQFNC
— Swara Bhasker (@ReallySwara) November 15, 2021
दरम्यान, अनेक लोक हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का? यावेळी पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असं गोखले यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
रोहित शर्मा कर्णधार असताना विराट कोहलीला संघात काय स्थान असेल; स्वत: रोहितनं दिलं उत्तर, म्हणाला…
“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”
“महाविकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा गेंड्यालाही लाज वाटू लागली आहे”