Home महाराष्ट्र रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना...

रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरून अभिनेते विक्रम गोखले यांनी प्रतिक्रिया देत कंगणाच्या वकतव्याचं समर्थन केलं.

हे ही वाचा : रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना सवाल

‘कंगना म्हणाली ते खरं आहे. मी तिच्या वक्तव्याचं समर्थन करतो, कुणाच्या मदतीने नाही तर देशाला स्वातंत्र्य हे भिकेनेच मिळालं आहे, स्वातंत्र्यविर फाशीवर जात असताना त्यांना कुणीही रोखलं नाही’ , असं म्हणत विक्रम गोखले यांनी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा सवाल अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

“महाविकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा गेंड्यालाही लाज वाटू लागली आहे”

आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची टीका