काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच; अहमदनगरमधील ‘या’ मोठ्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
975

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशातच आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे अहमदनगर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हे ही वाचा : कोणाला जातीचे, लग्नाचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा, ‘नवाब मलिक झेरॉक्स सेंटर’; भाजप नेत्याचा टोला

अहमदनर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांच्यासह किरण शिंदे, संतोष धनगर, विजय शिंदे, अंकुश धनगर, चंदर शिंदे, गोरख धनगर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर लकीभाऊ जाधव यांच्यासोबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू गांगर, महाराष्ट्र संपर्क प्रमुख दौलत मेमाणे, आदीवासी लोकगायक संदीप गवारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इंटकचे जयप्रकाश छाजेड, भटके-विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी – 

हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे…; चित्रा वाघ यांची टीका

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे; राज्य सरकारकडून ‘या’ महत्वाच्या मागण्या मान्य

नाशिकमध्ये राजकीय हलचालींना वेग; शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेसह सर्व पक्षांमध्ये पक्षांतराचे प्रयोग जोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here