आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं- रावसाहेब दानवे
बीड जिल्ह्यातल्या नांदूरघाट येथून जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या नेतृत्वात ‘नवनिर्माण जनसंपर्क यात्रे’ला सुरुवात झाली. तसेच यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, नांदूरघाट येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते, करोडो रुपये खर्च करून वाघे बाभूळगाव येथून पाणी पुरवठ्याच्या योजना नांदूरघाट गावासाठी राबवण्यात आल्या आहेत, परंतु गावामध्ये पाणी पुरवठा सुरू नाही. स्थानिकांच्या समस्या ऐकून धस यांनी त्यांना आश्वासन दिलं. तसेच नागरिकांना त्यांच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा विश्वासही धस यांनी नागरिकांना यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा टोला
राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
राज्यातील तीन पक्षाच्या सरकारलाही आमचा धाक- चंद्रकांत पाटील