Home महाराष्ट्र संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब

संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलं आहे.

राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहेत. मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न चर्चेशिवाय सुटणार नाही, हे मी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करु. उच्च न्यायालयाचा योग्य तो निर्णय येईल. येणारा निर्णय मान्य असेल, असं परब म्हणाले.

दरम्यान, भाजपनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करु. निदर्शन करणं हा प्रत्येकाचा अधिकारी आहे. मात्र, न्यायालयासमोर आत्मदहनाची धमकी देणं योग्य नाही. न्याय योग्य पद्धतीनं मागायला हवा, असंही अनिल परब यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”

राज ठाकरेंकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवांचं दर्शन; अर्पण केली श्रद्धांजली

मोठी बातमी! चित्रा वाघ यांच्यावर भाजप सोपविणार ‘ही’ मोठी जबाबदारी”