आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीत भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन पक्षाची आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. तशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली. ते मुंबईत बोलत होते.
हे ही वाचा : “स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं आहे, मी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करतो”
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. तर महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून त्याची चर्चा राजकीय ठरावात करण्यात येईल.
दरम्यान, पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होईल, अशी माहितीही केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; नवी मुंबईतील अनेक तरूणांनी मनसेचा झेंडा हाती धरला”
“1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता”
“…तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा”