Home महाराष्ट्र “एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली विझवणाऱ्या या सरकारला आता कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीये”

“एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली विझवणाऱ्या या सरकारला आता कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीये”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल सरकारने कारवाई करणे सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत एसटीचे कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्य सरकारने आतापर्यंत संपात सहभागी असलेल्या दोन हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे हाॅस्पिटलमधून काम करताहेत, केअर टेकर मुख्यमंत्र्यांची गरज नाही- संजय राऊत

ऐन दिवाळीत २ हजार ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय.. नोकरी घालवणं.. उपाशी मारणं.. बेघर करणं.. आत्महत्येस प्रवृत्त करणं.. हाच का MVA चा कॅामन मिनिमम प्रोग्राम? हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय,  निलंबन_सरकार चा धिक्कार असो!, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाने ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत

राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?; ड्रग्स प्रकरणावरून पंकजा मुंडेचा सरकारला सवाल

 भाजपाला मोठा धक्का! ‘या’ अभिनेत्रीने दिली पक्षाला सोडचिठ्ठी