आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोलकाता : पश्चिम बंगालमधील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाचा पराभव केला होता. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. मात्र, आता पश्चिम बंगालमध्ये भाजपाला आणखी एक झटका बसला आहे.
सात महिन्यांपूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने पक्ष सोडला आहे.बंगाली अभिनेत्री श्रवंती चॅटर्जीने मार्चमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. तब्बल सात महिन्यानंतर आज त्यांनी ट्विट करत पक्षाला सोडचिठ्ठी दिले असल्याचं जाहीर केलं आहे.
हे ही वाचा : भाजपच्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीची साथ; इंदापूरात चर्चेला सुरूवात
“मागील विधानसभा निवडणूक लढलेल्या भाजपाशी मी सर्व संबंध तोडत आहे. पक्षात कोणताही उत्साह दिसत नाही. बंगाली जनतेच्या हितासाठी पक्ष प्रामाणिकपणा दाखवत नाही.” असं ट्विट श्रवंती चॅटर्जी यांनी केलं आहे.
दरम्यान, आगामी काळात श्रवंती चटर्जी यांचा तृणमूलमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“स्टाॅयनिस-वेडची मॅच विनिंग खेळी; पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश”
“स्वातंत्र्यसारख्या विषयावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही”
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यासह 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”