Home महाराष्ट्र “महाविकास आघाडी सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत”

“महाविकास आघाडी सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील एसटी कर्मचारी जमायला सुरुवात झालीय.याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात प्रसंगी आपल्या घरापासून दूरवरच्या शहरांमध्ये राहून ज्यांनी कोरोनाशी चाललेल्या युद्धात सहभाग घेतला. अशा एसटी कर्मचाऱ्यांवर एल्गार करण्याची वेळ यावी. हे महाविकास आघाडी सरकारच्या महाभकास धोरणांचेच अपयश आहे, हा जुलूम मविआ सरकारने त्वरित थांबवावा. मविआ सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत. त्यांच्या या गलिच्छ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना न केवळ संप करावा लागत आहे. तर थेट आत्महत्येचा पर्याय निवडावा लागत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; भाजपची मागणी

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकार का पूर्ण करत नाही?, एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून आणखी किती दिवस संप करतच काढावे लागणार?, गेले 17 महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, त्यात तुटपुंजा दिवाळी बोनस, आपलं कुटुंब ते कसे सांभाळणार?, आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा मविआच्या मंत्र्यांसाठी अभिनेत्याचा मुलगा महत्त्वाचा आहे का? निर्दयी मविआ सरकारच्या मंत्र्यांनी माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“टायगर अभी जिंदा है; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराला संदेश; चर्चांना उधाण”

अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल

शिवशाही नव्हे, मोगलाई सुरू आहे, हम करे सो कायदा चालणार नाही; चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा