आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या गाडीचे वाहक गणेश भुते यांनी त्यांचे वाहन शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात आमदार पडळकरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हे ही वाचा : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर; भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सध्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू झाला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजू जानकर यांचे मेहुणे शिवसेनेच्या उमेदवारास मदत करीत असल्याच्या रागातून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी मारहाण केल्याचा दावा राजू जानकर यांनी केला आहे. तसेच याबाबत विचारणा केली असता, आमदार पडळकर यांनी दमदाटी केली, आणि आटपाडी पोलीस ठाण्यासमोर येण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आलेल्या राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून आमदार पडळकर यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जानकर यांनी केला आहे.
दरम्यान, जानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आटपाडी पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह गणेश भुते यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
आता मी ढवळाढवळ करू का?; उदयनराजेंचा थेट राष्ट्रवादीसह विरोधकांना इशारा
भाजपचा काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रेवश
महिला सरपंचांना मिळणार ‘स्वर्गीय मीनाताई ठाकरे’ पुरस्कार