आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत किरीट सोमय्यांविरोधात आज नागपुरात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत दिली आहे.
हे ही वाचा : “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण”
किरीट सोमय्या हे सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी आणि स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरू असते. या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दीडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करण्यात आला आहे, असं अतुल लोंढे म्हणाले आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार; बँक महाविकास आघाडीच्या हातात
…आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल