Home महाराष्ट्र “महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?; उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक”

“महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?; उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : भाजपा आमदार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बंद दाराआड चर्चा; चर्चेला उधाण

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान, केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये 5 रूपयांची तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. तसेच इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

महत्वाच्या घडामोडी –

इंधन कपातीवरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

…त्यामुळे राज्यातील भाजपाचे नेते महाराष्ट्रद्रोही आहेत; काँग्रेसची टीका

“गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक; निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”