आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची माहिती समोर अली आहे. त्यामुळे सांगलीच्या आटपाडीमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि भाजपा गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. या प्रकरणात एका कार्यकर्त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर अली आहे.
हे ही वाचा : किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार- नाना पटोले
सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधील साठे चौकात झालेल्या या घटनेत राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आले.
दरम्यान, या वादाचे नेमके कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवारांच्या पळवापळवी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे काही जण जखमी झाले आहेत. आटपाडीमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहां- चित्रा वाघ
राष्ट्रवादीनं आता शरद पवारांवर जास्त हक्क सांगू नये- बाळासाहेब थोरात
…नाहीतर नारायण राणेंचं मंत्रीपद जाऊ शकतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला