आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षे शिल्लक आहेत. मात्र, त्या आधीच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर बोलत होते.
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी 50-50 जागा जिंकून आणायच्या. मग सत्ता महाविकास आघाडीचीच आहे. भाजपला कधीच एवढ्या जागा जिंकता येणार नाही, असं गणितच अर्जुन खोतकर यांनी जुळवून आणलं आहे. त्यामुळे खोतकरांचा हा फॉर्म्युला आघाडी स्वीकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा : “नारायण राणेंसारख्या भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं; त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये”
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवण्यात सक्षम आहेत. मी तुमच्यासमोर विधानसभेचे एक सोपे गणित सांगतो. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही प्रत्येकी 50 जागा निवडून आणायच्या. म्हणजे दीडशे जागा होतील. भाजपवाले पावणेदोनशे जागा निवडून आणू शकतात का? आताच त्यांची स्थिती वाईट झाली आहे. ज्या होत्या त्याही जागा त्यांच्या हातातून जात आहेत. आम्ही पुन्हा येऊ म्हणणाऱ्यांनो सत्ता विसरून जा, तुमचा कधीच नंबर लागू शकणार नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय- नारायण राणे