आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नुकताच पार पडलेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर विजयी झाल्या. याच पार्श्वभूमीवर हा विजय म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरुन आता भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधालय. ते शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकतात. तेव्हा संजय राऊत यांनी बोंबलत बसू नये. शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय झाली आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.
हे ही वाचा : …तर तुमचे कोट तुम्हाला भांडीवालीला द्यावे लागतील; संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर
दरम्यान, संजय राऊतांचे सामानातील अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र जल्लोष करण्यास सुरुवात केली. आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, ओरडत फिरले. महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आल्याचा सर्वस्त्र डंका पिटला जात आहे; पण मला त्यांना सांगायचे आहे. उमेदवाराची निशाणी फलंदाज होती. धनुष्यबाण नव्हती. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांना हास्यास्पद दावे करण्याची सवय आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच. डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या, असं नारायण राणेनी म्हटलं आहे.
दरम्यान अमचे 303 पेक्षा अधिक खासदार आहेत. तुम्ही एका खासदाराच्या भरवशावर दिल्लीत धडक मारण्याची भाषा करता. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही. दिल्लीला धडक मारण्याचा प्रयत्न केला तर संजय राऊत डोक्याविना दिसतील, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
फक्त घोषणा करून आणि भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत- रक्षा खडसे
फेसबुकची मोठी घोषणा ; ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद
फडणवीसांनी दिवाळीनंतर बाॅम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन तोंड उघडावं- रोहित पवार