आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दादरा नगर हवेलीमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकविला. अशातच भाजपच्या जीवावर शिवसेनेचे आमदार निवडून आल्याचं भाजपकडून बोललं जात होतं. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आजच्या सामनातून भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. आणि शिवसेना भाजपच्या जीवावर नाही तर स्वबळावर जिंकल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : एस टी कामगारांना नोकरीवरून काढू नका नाही तर…; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा
एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
शिवसेनेने हुकूमशाहीबद्दल बोलावं म्हणजे दिवसाढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतो याचं वर्णन करण्यासारखं आहे. ते एक निवडणूक जिंकले. पण संपूर्ण देशात आम्हाला मोठं आव्हान उभं केलं, किंबहुना स्वप्नात पंतप्रधान बनण्याचीही स्वप्ने पडत असतील, मंत्रीमंडळाची रचनाही केली असेल, खातेवापटही केलं असेल, राऊत साहेब कोट शिवूनही बसले असतील. त्यामुळे तुमच्या स्वप्न रंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर करणार नव्या घरात ‘गृहप्रवेश’ !
“भाजपा-शिवसेना युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली”
“दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले”