आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : देवेंद्रजींच्या हातात काही बाॅम्ब असतील तर त्यांनी तो फोडावा- संजय राऊत
आता अनिल देशमुखांचे सर्व मार्ग बंद झाले. त्यामुळेच ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले, असं मी कालच सांगितलं होतं. सर्वसामान्य माणूस सापडत नसेल तर सर्च वॉरंट निघाले असते. काही जण जात्यात आहेत तर काही जण सुपात आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 12 कोटींची मालमत्ता सील केली गेली. एकामागे एक रांग लागली आहे. मंत्रिमंडळाने आपला नैतिक अधिकार पूर्णपणे गमावला आहे. उद्धवजी, आता तरी सरकार बरखास्त करा. नैतिकता असेल तर राजीनामा द्या. पुन्हा एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या., असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही नारायण राणेंसारख्यांना पुरून उरलो आहोत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल
पुण्यात पुढची सत्ता राष्ट्रवादीचीच; ‘या’ आमदाराचा विश्वास