“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यासह 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
590

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीने आज काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस; म्हणाल्या, जाहीरपणे माफी मागा नाहीतर…

आज परभणीच्या सोनपेठ नगरपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्यासह सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. तसेच आजच भाजपला धक्का देत यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनीही आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीची परभणी व यवतमाळमधील ताकद निश्चितच वाढली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जळगावमध्ये भाजपकडून शिवसेनेला खिंडार, शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका?; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here