आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी राज्यपाल नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यापालांची भेट घेतली.
छगन भुजबळांनी यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन भुजबळांनी राज्यपालांचं स्वागतही केलं. या भेटीत राज्यपाल आणि छगन भुजबळ यांच्यात थोडावेळ चर्चाही झाली. तसेच या भेटीवरून राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, या भेटीदरम्यान नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय या देखील उपस्थित होत्या.
राज्याचे राज्यपाल @BSKoshyari
हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना नाशिक गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी,आमदार देवयानी फरांदे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे,
पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय pic.twitter.com/DejThzI9tO— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 31, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”
“भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही”
औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार; पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक