आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : निवडणुका लागल्या की, महाविकास आघाडीतील आमदार भाजपमध्ये येतील, असा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपमध्ये येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं दानवे यांनी यावेळी म्हटलं. तसेच यावेळी बोलताना दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
हे ही वाचा : शरद पवार पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार; गोपीचंद पडळकरांचा टोला
आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युती तोडली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे, अशी टीका दानवेंनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपची काळजी करू नका, स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनून दाखवा; भाजपचा पवारांवर पलटवार
देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका
मनसेची अनोखी बॅनरबाजी; शिवसेनेचं अभिनंदन करणारा उलटा बॅनर लावला