Home महाराष्ट्र भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा

भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि 3 आमदारांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे 13 आमदार आणि काही नेते पक्ष सोडणार असल्याचा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशमधील चित्र बदलत असून तिथे परिवर्तन होणार आहे. लोकांना बदल हवा आहे. स्वामी प्रसाद मोर्य यांनी भाजपचा राजीनामा दिला ही सुरुवात आहे. त्यांच्यासोबतच 13 आमदार व इतर काही नेते पक्ष सोडणार आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका; ‘य़ा’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

पुढील काही दिवसांत आणखी नेते भाजप सोडून परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होतील”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी – 

शरद पवारांनी कोणत्या अधिकारांनी एसटी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली?; भाजपच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?; भाजप नेत्याचा सवाल