Home देश भारतीय वायुसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून 120 भारतीय सुरक्षित परतले

भारतीय वायुसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून 120 भारतीय सुरक्षित परतले

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी सकाळी भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर या विमानाने लँडिंग केले.

दरम्यान, गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचे हार घालून स्वागत करण्यात आले. तिथून बसद्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! गेल्या 4 दिवसांपासून खासदार उद्यनराजे भोसले रूग्णालयात, पुण्यात उपचार सुरू”

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का?; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांचा सवाल

अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं; रावसाहेब दानवेंचा टोला

“ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”