Home महाराष्ट्र दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन-तीन दिवसात निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन-तीन दिवसात निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग : दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावलं होतं.  दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला. तसेच याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेंव्हा हा विषय मांडण्यात आला होता. 1-2 दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“कोकण सब हिसाब करेगा…; मुख्यमंत्र्यांच्या कोकण दाैऱ्यावरून नितेश राणेंची टीका

लाज वाटते अशा मुख्यमंत्र्याची आम्हांला; मुख्यमंत्र्यांच्या कोकण दाैऱ्यावरून निलेश राणेंचा घणाघात

“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”

सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील