पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितलं आहे.
वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे प्रकाश आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने या आंदोलनाचे महत्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजप सोबत असलेला हा वारकरी वंचितकडे गेल्याने सगळ्यांना याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, प्रशासनासोबत झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी येतील असा इशारा आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
5 वर्षांमधील कारभार सुरळीत झाला असला तरी…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा; याेग्य ती काळजी घेऊन सण साजरा करू
आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही; फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट अजित मोहन यांचं स्पष्टीकरण
वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार