मुंबई : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला आहे. त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
युजवेंद्र चहल याने कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना ‘हो’ म्हणत आहोत, असं ट्विट केलं आहे. युट्यूबर धनश्री वर्मा आणि चहलचा घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
दरम्यान, अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी…; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? संजय राऊतांचा सवाल