मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. बंगालमध्यमध्ये तृणमूलने 292 जागांपैकी तब्बल 214 जागांवर बाजी मारत विजय मिळवला. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत छगन भुजबळांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असं होत नाही. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो. पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं., असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“भारतनाना माफ करा, तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”
पंढरपूर पोटनिवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे श्रेय या बंगालच्या वाघिणीला द्यायला हवं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“त्या अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलंय”