मुंबई : ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला होता.
महसूलमंत्री पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षांअगोदरच झालं आहे. याचेही भान यांना राहिले नाही, असं पडळकरांनी म्हटलं होतं. यावर बाळासाहेब थोरात यांची मुलगी आणि अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, असं ट्विट करत शरयू देशमुख यांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला आहे.
पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..! https://t.co/KhFuxuQOSe
— Sharayu Deshmukh (@SharayuDeshm) June 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत”
“संजय राऊतांनी 6 आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं, आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”
“आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीही नाहीत, मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक”
भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?; अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल