आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?

0
164

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी लसीवरून राजकारण पेटलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडच्या वतीनं रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं होतं. तर त्याआधी भाजपच्या गुजरातमधील पक्ष कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा आढळला होता. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रेमडेसिवीर बाबत “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडिसिवीर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं पलटवार प्रविण दरेकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, तुम्ही एवढेच जर निष्पक्ष असाल तर, रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा सवालही दरेकरांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”

महाराष्ट्रात लोकशाही नसून ‘लॉकशाही’ आहे; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

“जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी”

…तर संघर्ष अटळ आहे; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here