“तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरी तुमच्या पक्षावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही”

0
792

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला. तसेच चाकणकरांनी यावेळी लखीमपूर येथे झालेल्या घटनेवरूनही भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आजचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकाल म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मुजोरीला आणि अहंकाराला जनतेने लगावलेली सणसणीत चपराक आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरीही तुमच्या संंपूर्ण पक्षावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात चाकणकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण मनसेची साथ हवीच?

शिवसेनेची अवस्था अत्यंत दयनीय, त्यांना चौथ्या क्रमांकावर जावं लागलं; प्रविण दरेकरांची टीका

लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here