Home महाराष्ट्र “तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना”

“तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना”

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीपातीचं राजकरण करत असल्याचा आरोप केला होता. यावरून आता संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी राज ठाकरे यांनी खुलं आवाहन दिलं आहे.

राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक घेऊन जाहीर चर्चा करावी. सत्य इतिहासाचे दर्शन करावे. तिथं संदर्भ व पुराव्यासह मांडणी होईल. नाही तर उगाच मुक्ताफळे उधळून महाराष्ट्राला वेठीस धरू नये. असं मनोज आखरे यांनी म्हटलं.

दरम्यान, सर्वांना माहिती आहे की, तुमचा इतिहास हा दंगली घडविण्याचा आहे. आमचा इतिहास हा दंगली शमविण्याचा आहे. कारण तुम्ही आपण दंगलीचे स्त्रोत पसरविणारा इतिहास लेखन करणाऱ्या तोतया बाबासाहेब पुरंदरेंसारख्या शाहिरांच्या विचारांचे वारसदार आहात. , असंही मनोज आखरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात मंदीरे बंदच राहणार हा उद्धव ठाकरेंचा ‘नया महाराष्ट्र’; नितेश राणेंची जहरी टीका

पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

…तरी शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही; उदय सामंत यांचा भाजपवर हल्लाबोल

निर्मलाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं