नवी दिल्ली : नाशिकमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर आता दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 400 रूग्णांना जीव गमवण्याची वेळ आली होती. यावर तातडीने सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे.
तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
तुम्ही हे वाचलात का?
चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक! रसल, पॅट कमिन्सच्या वादळी खेळीनंतरही कोलकाताचा 18 धावांनी पराभव
दरम्यान, यावेळी न्यायालयाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या खासगी कंपन्यांनाही जोरदार फटकारलं. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 21.5 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशावेळी पर्याप्त ऑक्सिजनचा साठा असणे गरजेचं आहे. खासगी कंपन्यांना एवढी हाव सुटली आहे का, त्यांना साधी माणुसकीही दिसत नाही, असं उच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्या रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू”
मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या नाशिकला जाण्याची शक्यता
नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर