आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेला मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी डिवचलं आहे.
मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे, त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?, असा सवाल महेंद्र भानुशाली यांनी केला आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदूत्व ते खोटे हिंदूत्ववादी. पूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदूत्ववादी नेता पाहिला. सगळ्यांना माहिती पडलं की खरा हिंदूत्ववादी नेता राज ठाकरे आहेत, असंही भानुशाली म्हणालेत.
दरम्यान, आज कशी परिस्थिती झालीय की तुमचेच आमदार सांगतायत तुम्ही हिंदूत्व सोडल्याने आम्हाला इथं जावं लागलं आहे, असा टोलाही भानुशाली यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेणार का?; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…
आमदारांच्या बंडामागे खरंच मुख्यमंत्र्यांचा हात?; स्वत: उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
“आम्ही शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही; शिंदे गटातील ‘या’ महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल”