मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली.
एसपी बोलायला तयार नाहीयत. दरवाजा बंद करुन बसलेत. आम्हाला अशी भीती आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे. राणेंना असच ताटकळत ठेऊन त्यांना न्यायालयासमोर न नेता त्यांना अटक करुन रात्री त्यांचा छळकरायचा हा देखील या सरकारचा प्रयत्न असू शकतो, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
मला कोणीतरी सांगितलं की, एका मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्याने एसपींवर दबाव टाकला आणि सांगितलं की, काहीही करा आणि अटक करा. राजकीय लढाई राजकारण्यांनी लढली पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. तत्वाची तत्वाने, न्यायाने न्यायाची लढाई लढली पाहिजे. भाजपाचा कोणताही कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत वागत नव्हता. शिवसेनेने निषेध केला मात्र आम्ही जनादेश यात्रा सुरु ठेवलेली, असंही प्रसाद लाड यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
कदाचित त्यांच्या संस्काराचा तो भाग असावा; शरद पवारांचा नारायण राणेंना टोला
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक”
सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं,पण…; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं चॅलेंज
…पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- देवेंद्र फडणवीस