मुंबई : महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच आधी मजूर त्यांच्या गावी नीट पोहोचले का याकडे लक्ष द्या असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे.
उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे की, “तसं असेल तर आम्हाला देखील येथे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज सुरु केलं पाहिजे. सर्वांना पारखून घेतलं पाहिजे.
उत्तर प्रदेशातील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचलेत का? त्यांना अन्न पाणी नीट मिळतंय का याकडे योगींनी लक्ष द्यावं, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्रात या मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल,” भाजपा व्यतिरिक्त सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे असंही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत आहे- देवेंद्र फडणवीस
…म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रेंडिंग घडामोडी –
अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली कामगारांच्या मदतीलाhttps://t.co/yFKmzuHTrs@MadhuriDixit #लॉकडाऊन #मराठी
— घडामोडी (@ghadamodi1) May 25, 2020