… तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात; बाळासाहेब थोरातांच भाजपवर टीकास्त्र

0
230

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांना निवेदन देत सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. यावरून काँग्रेस प्रेदशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला.

भाजप नेत्यांना राजपालांशिवाय काही जमत नाही. फक्त तक्रारीला ते राज्यपालांकडे जात आहेत. किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. त्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली.

दरम्यान, भाजपला कायम खोटेपणा दिसून येतो. आधी सुरुवातीला काही झालं असेल पण आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात जेवढं काम होत नाही तेवढं आता राज्य सरकार करत आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्ही जर मुख्यमंत्री असता, तर आमच्यावर ही वेळच आलीच नसती; पोलिसाने फडणवीसांसमोर मांडली व्यथा

“शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं”

…तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; जितेंद्र आव्हडांच निर्मला सीतारमन यांच्यावर टीकास्त्र

काश्मीर आमचं आहे, होतं आणि आमचंच राहणार; आफ्रिदीला शिखर धवनचं सडेतोड उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here