मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेसह विरोधकांना देखील कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकजुट दाखवण्याचे आवाहन केले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत… आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
ह्याला जबाबदार ठाकरे सरकार नाही तर कोण?? दीड वर्षात जर महाराष्ट्रात दर्जेदार आरोग्य सेवा उभी राहू शकत नाही तर सामान्य लोकांनी ह्या फालतू सरकारचं का ऐकावं?? काही मदत न मिळता फक्त लॉकडाऊन होत राहिलं तर लोकं मंत्रालयात घुसून मंत्रीना चोपतील. pic.twitter.com/7uh3J6Tvmy
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला
“अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?”
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच मोठ वक्तव्य; म्हणाले…