नंदीग्राम : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघातून स्वत: ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.
आज त्यांनी नंदीग्राममध्ये व्हीलचेअरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलं. होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर आहे. मेलेल्या वाघापेक्षा जखमी वाघ नेहमीच खतरनाक असतो, अशा शब्दात त्यांनी भाजपला ललकारलं.
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत. अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार असून त्यांचे नंदीग्रामवर प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अमित शहा-शरद पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; जयंत पाटलांनी दिली माहिती
दीपालीच्या आत्महत्येला शिवकुमार एकटा जबाबदार नाही- चित्रा वाघ
उद्धव ठाकरे यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत- प्रकाश आंबेडकर