“होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे”

0
290

मुंबई : 21 जूनपासून देशात 18 ते 44 या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 83 लाख नागरिकांना लस देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या ट्विटसोबत भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली आहे.

दरमयान, गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा, शिवसेनेची चिंता करावी”

नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

“देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजलीये, त्यामुळे जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल”

पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे; बालेवाडीतील कार पार्किंगवरून निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here