Home महाराष्ट्र …यावरून कळतं की, या सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे; निलेश राणे

…यावरून कळतं की, या सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे; निलेश राणे

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळं झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज दरड दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात काल एक बैठक झाली. या बैठकीत काही निकष ठरवून आज पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू, असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटलं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार व विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.

लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला. विचार करेपर्यंत लोकं मेली तरी चालतील, यावरून कळतं या हलकट सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे. इतका नीच तर हिंदी पिक्चर मधला कुठला विल्हन देखील नसेल जितकं नीच ठाकरे सरकार लोकांशी वागत आहे., अशी टीका निलेश राणेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपसोबत युती नाही, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार”

“शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण”

‘ए तु थांब रे…मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच दरेकरांना झापलं; पहा व्हिडिओ

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त- गोपीचंद पडळकर