वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने 31 चेंडूत 70 धावा ठोकल्या. ज्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने तिसऱ्या लढतीत टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय काही योग्य ठरला नाही. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड गोलंदाजांची धुलाई केली आणि 20 षटकात तब्बल 208 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 70, कर्णधार एराॅन फिंचने 69 तर जोश फिलिपने 43 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने डावाच्या 17 व्या षटकात गोलंदाजीस आलेला जेम्स नीशमच्या ओव्हरमध्ये तब्बल 28 रन्स ठोकल्या. मॅक्सवेलने या षटकात 4,6,4,4,4,6 अशा धावा ठोकल्या. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 20 षटकात 17.1 षटकात 144 धावाच करू शकला. व ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी विजय मिळवला. मात्र तरीही 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-1 ने आघाडीवर आहे.
दरम्यान, ग्लेन मॅक्सवेल फाॅर्ममध्ये आल्याने राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी ही आनंदाची बातमी येत आहे.
The last off Maxwell’s five big sixes! #NZvAUS pic.twitter.com/jIgeVr4t91
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
…तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- सुधीर मुनगंटीवार
“मोठी बातमी! तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड”
“तरूणीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा”