“अभिनेत्री विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण”

0
304

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या आपल्या नव्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र सध्या या चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे विद्याने एका मंत्र्याचं डिनरसाठीचं आमंत्रण स्वीकारलं नसल्याने हे चित्रीकरण थांबवलं असल्याचं  टाइम्स नाऊ च्या वृत्तात सांगितलं आहे.

काही दिवसांपुर्वी विद्या बालनला मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांचं हे आमंत्रण विद्याने स्वीकारलं नाही. त्यानंतर काही दिवसात शाह यांच्याकडून सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्याचे आदेश देण्यात आलं असल्याचं टाइम्स नाऊ च्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, विजय शाह यांच्यावर जरी हे आरोप लावले जात असले तरी त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. चित्रपटाची टीम माझ्याकडे चित्रीकरणासाठी परवानगी मागण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनीच मला लंच आणि डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र मीच हे आमंत्रण नाकारलं होतं. पण त्यावेळी मी त्यांना चित्रीकरणासाठी परवानगी दिली असल्याचं शाह यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की…; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर 3 महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची- नितेश राणे

नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here